तैवानवर हल्ल्याची चीनची तयारी? हायपरसोनिक मिसाईल तैनात

china-missile

चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना युद्धासाठी तयार आणि हाय अॅलर्टवर राहण्याचे आदेश दिले होते. आता एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की चीनने तैवानवर हल्ला करण्याच्या उद्देशान अत्याधुनिक असे हाइपरसोनिक मिसाईल तैनात केले आहेत. साऊथ चायना मार्निग पोस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, फुजिआन आणि झेजिआंग मध्ये चीनचं सैन्य DF-17 नावाचे मिसाईल तैनात करण्यात आले. अधिकृतरित्या अल्पशी माहिती जाहीर करण्यात आली आहे, मात्र हे रडारच्या टप्प्यात न येता हल्ला करण्यास सक्षम आहेत.

चीन आणि तैवानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहे. तैवानने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले असून अमेरिकेसोबत शस्त्रास्त्रांचा करार केला आहे.

फुजिआन आणि झेजिआंग मध्ये मिसाईल तैनात करण्यात आल्याच्या वृत्ताला ग्लोबल टाइम्सने केवळ एक अंदाज म्हटले आहे.

DF-17 नावाचे मिसाईल हे रडारला धोका देऊन एखादे शहर नष्ट करण्याची ताकद यामध्ये आहे. तैवानला आपल्या प्रभावाखाली आणण्यासाठी चीन याचा वापर करण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या