चीनचा खोटारडेपणा पुन्हा उघड; वुहानमध्ये 36 हजार मृतदेहांवर झाले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाबतची माहिती जगापासून लपवून ठेवत चीनने जगाला अंधारात ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच चीनने महत्त्वाची माहिती उघड केली नसल्याचा आणि खोटी आकडेवारी जगासमोर आणल्याचाही आरोप होत आहे. अमेरिकेने सादर केलेल्या एका अहवालातून चीनचा खोटारडेपणा पुन्हा जगासमोर आला आहे. करोना प्रकोपाच्या काळात चीनने मृतांची खरी आकडेवारी जगासमोर आणले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना जगभरात थैमान घालत असताना चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीवर जगाचा विश्वास बसत नव्हता. वुहान शहरात कोरोनाने झालेल्या मृत्यूपेक्षा 10 पट कमी आकडे दाखवण्यात आल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.

चीनच्या आकडेवारीनुसार वुहानमध्ये 2,524 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वॉशिंग्टन आणि ओहियो युनिव्हर्सिटीच्या अहवालातून जानेवारी ते मार्च 2020 या काळात वुहानमध्ये 36 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. वुहानमधील स्मशानातील आकडेवारीचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जानेवारी ते मार्च या काळात वुहानमधील स्मशानांमध्ये दिवसरात्र अंत्यसंस्काराचे काम सुरू होते. त्यावरून वुहानमधील परिस्थिती आणि चीनने लपवलेले सत्य उघड होत आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनच्या आकडेवारीनुसार वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत आढळला. मात्र, डिसेंबरमध्ये निमोनियासारख्या रोगाची लक्षणे अनेकांमध्ये आढळत होती. तसेच जानेवारी महिन्याच्या अखेरीस वुहानमधील आरोग्ययंत्रणा कोलमडण्यास सुरुवात झाली. 90 हजार बेड शहरात होत्या. शाळा आणि हॉचेल ताब्यात घेत त्यात एक लाख बेडची भर घालण्यात आली. तेव्हा चीनच्या प्रशासनाने कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार सांगितला होता. 23 मार्चपर्यंत वुहानमध्ये इतर प्रांतातून 42,600 डॉक्टर आणि आरोग्यसेवक पाठवण्यात आले. आधीच शहरात 90 हजार डॉक्टर आणि आरोग्यसेवक होते. तेव्हा चीनने रुग्णांची संख्या 50 हजार सांगितली.

वुहानमधील आठ स्मशान होणाऱ्या अंत्यसंस्काराची माहिती मिळवून हा अहवाल तयार केला आहे. 25 जानेवारीपासून शहरातील स्मशानात 24 तास अंत्यसंस्कार होत होते. सरासरी 136 अंत्यसंस्कार होणाऱ्या स्मशानात सुमारे 816 अंत्यसंस्कार होत होते. कोरोनाचे संक्रमण वाढल्यावर ही आकडेवारी दररोज 2100 पर्यंत पोहचल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अभ्यासात अस्थिकलशांची आकडेवारीही मिळवण्यात आली. जानेवारी ते मार्च या कालावधीत 36 हजार अस्थिकलशांची खरेदी झाली होती. या सर्व माहितीच्या आधारे चीनच्या वुहान शहरात जानेवारी ते मार्चदरम्यान 36 हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. याअहवालातून चीनचा खोटारडेपणा पुन्हा जगासमोर आला आहे.