बापरे! कानातून निघालं झुरळाचं कुटुंब, डॉक्टर हैराण

चीनमध्ये एका व्यक्तीला कानात भयंकर दुखु लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी त्याच्या कानात झुरळाची मादी आपल्या 10 पिल्लांसह मुक्तविहार करत असल्याचं बघून डॉक्टरही चक्रावले. ल्वू (24) असे या तरुणाचे नाव आहे.

गेल्या महिन्यात ल्वूच्या कानात दुखू लागलं. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. कानात दुखायला लागलं की तो कुठलासा ड्रॉप टाकून वेळ काढत होता. सर्दीमुळे कानात ठणकत असावं असं त्याला वाटलं. पण नंतर त्याला रोजच हा त्रास होऊ लागला. त्यामुळे तो डॉक्टरकडे गेला. पण डॉक्टरांनी त्याला ग्वांगडोंग प्रांतातील हुआंग जिल्ह्यातील सनेह रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याच्या कान तपासला असता आत झुरळाची मादी आणि 10 पिल्लं त्यांना दिसली. ते पाहून डॉक्टरांना थक्काच बसला. झुरळाची पिल्लं ल्वू च्या कानाच्या पडद्यावर फिरताना दिसली. त्यानंतर डॉक्टरांनी चिमट्याने सर्व पिल्लांना बाहेर काढले. त्यानंतर मादीला बाहेर काढले.

आपली प्रतिक्रिया द्या