अवयवदानाची इच्छा अपूर्ण, सिगारेटमुळे फुफ्फुस पडले काळे

2127

 सिगारेटचे व्यसन शरीरासाठी किती घातक ठरु शकते हे नुकतेच चीनमध्ये दिसून आले आहे. अवयवदानाची इच्छा असलेल्या एका बावन्न वर्षीय व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. पण त्याची शेवटची अवयवदानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे फुफ्फुस बाहेर काढले. पण त्याची अवस्था बघून डॉक्टरही हैराण झाले. कारण गुलाबी फुफ्फुसाऐवजी त्याच्या शरीरात काळे फुफ्फुस होते. अती सिगारेट सेवनामुळे त्याच्या फुफ्फुसाचा रंग बदलून काळा झाला होता. त्यामुळे त्याच्या फुफ्फुसाबरोबरच इतर अवयव न घेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

संबंधित व्यक्तीला ला सिगारेटचे व्यसन होते. गेल्या 30 वर्षांपासून तो सिगारेटच्या आहारी गेला होता. दिवसाला सिगारेटचे एक पाकिट तो संपवायचा. अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या त्या व्यक्तीची तब्येत ढासळत गेली. नंतर डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केले.  पण त्याआधी त्याने अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या मृत्यूनंतर २४ तासाच्या आत त्याच्या शरीरातून अवयव काढणे गरजेचे होते. यामुळे डॉक्टरांनी सर्वप्रथम त्याचे फुफ्फुस बाहेर काढले. पण त्याची अवस्था बघून त्यांना धक्काच बसला. कारण त्याचे फुफ्फुस सामान्य व्यक्तीप्रमाणे गुलाबी नसून काळे होते. सतत सिगारेट पित असल्याने त्याचा थेट परिणाम त्याच्या फुफ्फुसावर व इतर अवयवांवरही झाला होता. डॉक्टरांनी याचा व्हिडीओ काढला आहे. व्हिडीओ व्हायरल झाला असून  सिगारेट किती प्राणघातक व्यसन आहे हे लोकांना दाखवण्यासाठीच व्हिडीओ तो काढल्यसांगितले आहे. आतापर्यंत 25 मिलियन वेळा हा व्हिडीओ बघितला गेला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या