चीनचा हिंदुस्थानच्या माहितीवर डल्ला

चीनमधील गुप्तचर यंत्रणा आणि हॅकर्सनी हिंदुस्थानच्या माहितीवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. चीनच्या हॅकर्सनी इमिग्रेशन संदर्भात हिंदुस्थानच्या तब्बल 95.2 गिगाबाईट इतक्या माहितीवर डल्ला मारला असून अमेरिकेतील द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील हॅकर्सकडून अनेक परदेशी सरकारे, कंपन्यांच्या माहितीची चोरी करण्यात आली आहे.

द पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार मायक्रोसॉफ्ट आणि गुगलसह ऍपलच्या सॉफ्टवेअर यंत्रणाही सुरक्षित नसल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. चीन सरकारसाठी कामे करणाया एका कंपनीतील अज्ञात स्रोतांनी केलेल्या दाव्यानुसार 570 हुन अधिक फाईल्स, छायाचित्रे आणि चॅट लॉगची चोरी करण्यात आली आहे.