दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांच्या मुलीचा पूर्वाश्रमीचा नवरा शिरीष भारद्वाज याचे निधन झाले आहे. तो बऱ्याच काळापासून फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होता. दरम्यान बुधवारी सकाळी अचानक त्याची तब्येत बिघडली आणि तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयातच त्याने अखेरचा श्वास घेतला.
चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा हिचा पूर्वाश्रमीचा नवरा शिरीष भारद्वाज याच्या निधनाने सर्वांनाच चटका लागला आहे. चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा कोनिडेला हिने आई-वडिलांना विरोध नाकारुन 2007 साली शिरीषसोबत पळून लग्न केले होते. त्यानंतर कौटुंबिक वादातून 2014 साली ते विभक्त झाले. श्रीजा आणि शिरीष भारद्वाज यांची एक मुलगी असून ती श्रीजा सोबतच राहते. घटस्फोटांनंतर दोघांनी दुसरे लग्न केले. दोघंही आपआपल्या आयुष्यात आनंदी होते. श्रीजा हिने कल्याण देव यांच्याही दुसरा विवाह केला.