गेलची अखेरची मालिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पोर्ट ऑफ स्पेन

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा फेब्रुवारीमध्ये केली होती. मात्र आपला निर्णय बदलत त्याने हिंदुस्थानविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे विंडीज क्रिकेट बोर्डानेही त्याची हिंदुस्थानविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विंडीजच्या संघात निवड केली. त्याची ही अखेरची मालिका असण्याची शक्यता आहे.