नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी, कंपनीच्या सीईओने कर्मचाऱ्याला सेक्सस्लेव्ह बनवले

अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी ट्रेडशिफ्टचा सहसंस्थापक ख्रिस्तियन लँग याच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. लँग याने त्याच्या महिला सहाय्यकाला सेक्सस्लेव्ह बनविले होते आणि अनेक दिवस तिच्यावर बलात्कार केला असा आरोप आहे. नोकरीच्या बदल्यात लँग याने या महिलेकडून शरीरसुखासाठी करार करण्यास भाग पाडले होते असा आरोप आहे. लँग याची जेव्हा इच्छा होईल तेव्हा तो पीडितेचा शरीरसुखासाठी वापर करू शकेल असे या करारत म्हटले होते. पीडितेने लँगविरधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून लँगविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.

जोन डोचा दावा आहे की लँगने तिला कार्यकारी सहाय्यक म्हणून नियुक्त केल्यानंतर काही महिन्यांनी तिला नऊ पानी करारावर सही करण्याची जबरदस्ती केली. ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ नावाच्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे लँग याने करार तयार केला होता. जेन हिला गुडघ्यावर बसून लँग याच्याकडे त्याच्या गरजा जाणून घेण्याचे आर्जव करणे हे कलम देखील या करारात होते. या करारानुसार लँग जेव्हा केव्हा शरीरसुखाची मागण करेल तेव्हा जेनने त्यासाठी तयार होणे बंधनकारक करण्यात आले होते. शरीरसुखाला जेन कधीही नकार देऊ शकणार नाही असेही करारात म्हटले होते. जर लँगला कुठल्या गोष्टीचा राग आला तर तो राग कोणतीही कटकट न करता जेनला सहन करावा लागेल असेही यात म्हटले होते. नोकरीवरून काढून टाकले जाईल या भीतीने आपण या करारावर सही केली होती असे जेनने म्हटले आहे.

लँगने केलेला हा करार आणि जेनचा लैंगिक छळ जेव्हा कार्यालय प्रशासनापर्यंत पोहोचला तेव्हा प्रशासनाने लँगला तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवला. लँगने मात्र आपल्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. जेनसोबत आपण तिच्या मर्जीनेच शरीरसंबंध ठेवले होते असे लँगचे म्हणणे आहे. न्यू यॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे.