इजिप्तमध्ये चर्चला भीषण आग, 30 लहान मुलांसह 41 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्तमध्ये एका चर्चला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीदरम्यान चेंगराचेंगरी होऊन 41 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जखमी झाले. मृतांमध्ये 30 लहान मुलांचा समावेश आहे. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्राथमिक तपासात इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

पैरोच्या वायव्येकडील कामगारवर्गीय जिल्हा इंबाबाबा येथील अबू सिफायन चर्चमध्ये भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. रविवारी सकाळी कॉप्टिक ख्रिश्चन समाजाची बैठक सुरू असताना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 15 गाडय़ा घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आग लागवली तेव्हा चर्चमध्ये सुमारे पाच हजार जण उपस्थित होते. दुर्घटनेनंतर चेंगराचेंगरी झाली. त्यात 41 जण मृत्युमुखी पडले.