समलैंगिक जोडप्यांना मुले दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घटनात्मक मुद्दय़ांवर दिलेले निर्णय अनेकदा तुमच्या मनाचा आवाज असतात. अनेकदा मताचा आवाज संविधानात सांगितलेल्या गोष्टींपेक्षा वेगळा असतो, असे सांगतानाच समलैंगिक जोडप्यांना मुले दत्तक घेण्याचा अधिकार मिळावा असे आपले ठाम मत आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी प्रत्यक्षात दिलेल्या निर्णयाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, मी माझा निर्णय दिला तेव्हा अल्पमतात होतो. माझा विश्वास होता की, समलिंगी जोडपी मुले दत्तक घेऊ शकतात. त्याच वेळी, माझ्या तीन सहकाऱयांचा असा विश्वास होता की, असे होऊ नये. मात्र यावर निर्णय घेणे संसदेचे काम आहे. वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्ज टाऊन विद्यापीठाने आयोजित केलेल्या भारत आणि अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.