पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात आज सकाळच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाल्याची घटना घडली आहे.

महाराष्ट्र पोलीसांच्या गडचिरोलीतील ‘सी-60’ दलातील पोलीस जवानांचे नक्षल विरोधी अभियान राबवत सुरू होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलकाद्यांनी पोलीस जकानांकर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. या नक्षलकाद्यांच्या या गोळीबाराला पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार केला. यानंतर उडालेल्या चकमकीत एक पोलीस जकान जखमी झाला असून जवानाला हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपूर येथे रकाना करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे मोठय़ा प्रमाणात साहित्य जप्त करण्यात पोलीस जवानांना यश आले आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस कुमक वाढवण्यात आली आहे. तसंच नक्षलवाद्यांविरोधात शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.