कोपरगावात दोन गटात हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव शहरातील संजय नगर भागात मंगळवार, दि. 13 जून 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली असून यात तीन जण जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

भांडणाचे कारण, मात्र अद्याप अस्पष्ट असून याबाबत अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर भांडणात एका दुचाकीचीही तोडफोड करण्यात आली असून घटना घडल्यावर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. पोलिसांना घटना समाजात पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन या जमावाला पांगवले. सदर घटनेने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.