स्वच्छ सोसायटी, रुग्णालय, शाळांना मिळणार दीड लाखाचे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण मूल्यांकनासाठी पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संकुल, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा आणि स्वच्छतागृहांसाठी स्वच्छतेची स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये सर्वोत्तम ठरणाऱयांना दीड लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शहरी स्थानिक संस्थांशी निगडित स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये स्वच्छतेच्या मूल्यांकन स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेसाठी केंद्र सरकारच्या गृह व नागरी खात्याने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पालिकेच्या हद्दीमधील निवासी संकुल, मोहल्ले, रुग्णालये, बाजारपेठा, हॉटेल्स, शाळा, सामुदायिक शौचालये, स्वच्छ मुंबई प्रबोधन संस्था आणि मुंबई पालिकेच्या कार्यालयीन इमारतींची स्वच्छतेच्या दृष्टीने तपासणी करून मानांकन करणे आवश्यक आहे. यासाठी मे. युनायटेड वे मुंबई या खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https:/www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan या लिंकवर 15 नोव्हेंबरपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.

असे मिळणार बक्षीस

  • स्वच्छ निवासी संकुल – दीड लाख रुपये
  • स्वच्छ रुग्णालय (सर्वसमावेशक) – दीड लाख रुपये
  • स्वच्छ महापालिका रुग्णालय – एक लाख रुपये
  • स्वच्छ हॉटेल – एक लाख रुपये
  • स्वच्छ शाळा (सर्वसमावेशक) – दीड लाख रुपये
  • स्वच्छ महापालिका शाळा – एक लाख रुपये
  • स्वच्छ सामुदायिक शौचालय – एक लाख रुपये
  • स्वच्छ सार्वजनिक शौचालय – एक लाख रुपये
  • स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान संस्था – दीड लाख रुपये