
मुंबईकर-ठाणेकरांनी शुक्रवारी नववर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सुर्योदयाचा आनंद घेतला. मात्र पुढे दुपार आणि सायंकाळ ढगाळ वातवरणात हरवून गेल्याने चौपाटीवर सूर्यास्ताच्या साक्षीने फेरफटका मारायला गेलेल्या नागरिकांची निराशा झाली.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अगदी पुण्यातही संपूर्ण दिवसभर ढगांची गर्दी राहिली. नंतर रात्रीच्या सुमारास धुके आणि धूसर वातावरणाचे साम्राज्य पसरले.
मुंबईकर आणि ठाणेकरांनी नवीन कर्षातील पहिल्या सकाळीही सुखद गारव्याचा अनुभव घेतला. आशेचा किरण दाखवणारा सुर्योदयही अनेकांनी आपल्या कॅमेऱयात टिपला. मात्र दुपारपासून सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहिल्याने हौशी मुंबईकर-ठाणेकरांची निराशा झाली.
दिवसभर मळभ राहिल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या हवेतील आर्द्रतेचे प्रमाण एकाएकी वाढले. पूर्वेकडून आलेल्या वार्यांनी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या बऱयाचशा भागांत वातवरणावर परिणाम केला. हे वारे बाष्प घेऊन येत आहेत. त्यामुळे सर्व प्रदूषण जमिनीच्या दिशेने खाली एकत्र आले आहे. परिणामी, हवेतील आर्द्रता वाढली आणि धूसर वातावरण तयार झाले, असे कुलाबा वेधशाळेतील अधिवार्यांनी सांगितले.
































































