‘नटरंग’सारखे हातवारे करत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

3321

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचार चांगलाच तापलाय. रविवारी अनेक पक्षांच्या बड्या नेत्यांनी सभांचा धुराळा उडवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळवगावमध्ये पहिली सभा झाली. याच सभेत पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर सडकून टीका केलीय.

आमच्यासमोर कुस्ती लढायला कुणीच नसल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर केली होती. या टीकेला सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील सभेत शरद पवार यांनी उत्तर दिलं. ‘कुस्ती पैलवानांशी होते, या ‘इतरांशी’ होत नाही’ असं म्हणत पवारांनी हातवारे केले. त्यांच्या या टीकेवरून राजकीय चर्चा रंगल्या. या टीकेला आज मुख्यमंत्र्यांनी जळगावमधील सभेतून प्रत्युत्तर दिले.

कुस्ती पैलवानांशी होते, ‘इतरांशी’ नाही, आक्षेपार्ह हातवारे करत शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

काँग्रेस पेक्षा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती वाईट आहे. पवारांच्या पक्षामध्ये कुणी रहायलाच तयार नाहीए. ‘आधे उधर जओ, आधे इधर जाओ और कोई बचे तो मेरे पिछे आओ’ अशी पवारांची अवस्था आहे. यामुळे इतकी वर्षे महाराष्ट्रात काम केलेले राष्ट्रीय नेते पवारांना आता पराभव दिसू लागल्याने त्यांची विवेकबुद्धी कामी व्हायला लागलीय. म्हणून पवार साहेब कशा प्रकारे हातवारे करून बोलत आहेत हे आपण काल बघितले.

नरेंद्र मोदींची पवारांना ‘कोपर’खळी, व्हायरल व्हिडीओवरून साधला निशाणा

ते पुढे म्हणाले की, उत्तरे आम्हालाही देता येतात. पण असे हातवारे आम्ही कधी केले नाही. आम्ही नटरंगसारखं काम कधी केलं नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करू शकत नाही. आणि आम्हाला असे हातवारे करणंही शोभत नाही. 24 तारखेला महाराष्ट्राची जनताच दाखवेल कोण करा पैलवान आहे. कुणाला विजय मिळालाय हे दिसेल.

आपली प्रतिक्रिया द्या