नगर ब्रेकिंग : तोडगा निघत नसल्याने केंद्रीय मंत्री बैठक सोडून निघून गेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

लोकपाल व विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 30 जानेवारीपासून आमरण उपोषणास बसले आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावली आहे.

अण्णा उपोषणावर ठाम असल्याने अण्णांची मनधरणी करण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग राळेगणसिद्धमध्ये दाखल झाले. तब्ब्ल तीन तासाहून अधिक काळ चर्चा झाली असताना देखील अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

मुख्यमंत्री राळेगणमध्ये आले असता आज अण्णांचे उपोषण सुटणार अशी चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करून केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग दिल्लीकडे रवाना झाले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते.