नरेंद्र मोदी नावाची त्सुनामी विरोधकांना बुडवणार : मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

काँग्रेसने दिलेला जाहीरनामा पाहिला तर आपल्या सैन्याला अधिकतेने दिलेले अधिकार काढण्याचा विषय घेतला, देशद्रोहाचे कलम काढून टाकू असे काँग्रेसवाले म्हणाले, त्यांचा जाहीरनामा कोणासाठी आहे हे स्पष्ट होतंय, त्यामुळे केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक राहिली नसून देशाच्या अस्मितेसाठी, भविष्यासाठी, सुरक्षेसाठी ही निवडणू आहे. हे सर्व विषय मोदींच्या नेतृत्वाने होऊ शकते, असा ठाम विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अत्तापर्यत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कामांची ही पावती आहे. काहींना लाट दिसत नाही. जे लोक बोलत नाही त्यांच्या मनात लाट कायम आहे. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला त्यांनाच ही लाट दिसते. हिंदुस्थानात नरेंद्र मोदी नावची त्सुनामी आली असून या निवडणुकीत विरोधीपक्ष बुडवणार असून सर्वाधिक जागा आपल्याच महायुतीच्या येणार असे ते म्हणाले. 25 वर्षापासून प्रलंबीत असलेली कामे आम्ही सोडवली यात आमचा हातखंडा आहे असा टोला विरोधकांना लगावत विधानसभेपुर्वी नगरच्या साखळाईच्या आराखड्याला मंजुरी देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नगर तालुक्यातील वाळकी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, सेनेचे उपनेते अनिल राठोड, माजी मंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, महायुतीचे उमेदवारी डॉ.सुजय विखे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळासाहेब हराळ, दीपाली सय्यद, समाजसेवक राजाराम भापकर उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशद्राहासारखे कलम काढून टाकण्याची भाषा या काँग्रेवाल्यांनी केले. तसा त्यांनी जाहीरनाम्यात उल्लेख केला. वास्तविक पाहता हे कलम, देशद्रेहाचे असून यामध्ये किमान दहा वर्षाची शिक्षा असते. जर हे अधिकार काढणार असतील तर यांचा जाहीरनमा कोणासाठी आहे हे जाहीर होते असे फडणवीस म्हणाले. म्हणून देशाची ही निवडणूक विकासा बरोबर सुरक्षेची आहे, देशाला या गोष्टी फक्त नरेंद्र मोदीच देऊ शकतात म्हणून आपल्याला सर्वाधिक जागा निवडुन द्यावयाच्या आहेत, विखे यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.