महाजनादेश यात्रा : मुख्यमंत्री नगरमध्ये, शिर्डी विमानतळावर स्वागत

460
cm-ram-shinde

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेसाठी आज सकाळी शिर्डी विमानतळावर दाखल झाले. यावेळी पणन व वस्त्रोद्योग मंत्री आणि नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार स्नेहलता कोल्हे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एम. मुगळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुपये दहा लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या