NEET विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर स्टॅलिन यांची मोठा निर्णय; राज्यपालांच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट परीक्षेमध्ये दोनदा नापास झालेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर व्यथीत झालेल्या त्याच्या वडिलांनीही जीवन संपवले. यावरून राजकारण सुरू असतानाच मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मोठी घोषणा केली आहे. स्टॅलिन यांनी राज्यपाल रवी यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

17 वर्षांच्या जेगदीश्वरन आणि त्याचे वडील सेल्वाशेखर यांच्या मृत्यूचा हवाला देत मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, नीटविरोधातील विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने जनतेचा सात वर्षांपासून सुरु असलेला विरोध आणि संघर्षाचा हा अपमान आहे. त्यामुळे ते स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सांगितले की, ते या विधेयकाच्या मंजूरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ते पत्र पाठवणार आहे.

सीएम स्टॅलिन यांनी सांगितले की, ‘राज्यपाल द्रविडम, आर्यन, द्रमुक, वल्लुवर, वल्लालर आणि सनातनबद्दल काहीही बोलत असले तरी आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्ही त्याकडे वायफळ बडबड म्हणून दुर्लक्ष करतो. मात्र कोणी नियुक्त व्यक्तीने असा दावा केला की, पण गरीब पार्श्वभूमीतून येणाऱ्या सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त होत असतील तर तो शिक्षण व्यवस्थेवरील हल्ला आहे. तामिळ विद्यार्थ्यांचे भविष्य आमच्यासाठी महत्वाचे आहे. ते म्हणाले की, आम्ही सत्तेत राहू किंवा राहणार नाहीत. मात्र,आम्ही जनतेसाठी आवाज उठवत राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्टॅलिन म्हणाले की, राज्यपाल विद्यापीठांना नष्ट करत आहेत, उच्च शिक्षणात गोंधळ घालत आहेत आणि विधानसभेत मंजूर झालेल्या विधेयकांना मंजुरी देत ​​नाहीत त्यासाठी आम्ही त्यांच्यावर टीका करतो. त्यामुळेच स्वातंत्र्यदिनाच्या राज्यपालांच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. नीट परीक्षेमध्ये दोनदा नापास झालेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्युचे वृत्त कळताच वडिलांनीही जीवन संपवले. या घटनेचे राजकारण सुरू असतानात स्टॅलिन यांनी ही महत्त्वाची घोषणा केल्याने त्याची राजकीय चर्चा होत आहे.