
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली.
एका बाजूला राज्य सरकार कोरोनाशी धैर्याने लढा देत आहे. दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीला देखील तोंड देत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत आहे. दरम्यान कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे विधान परिषदेची निवणूक अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यापार्श्वभूमीवर राजपलांनी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे.


























































