शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

राष्ट्रीय पोलीस दिनानिमित्त देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पोलीस मुख्यालयात आदरांजली वाहण्यात आली.

प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. पोलीस दलांमधील 26 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस अंमलदारांना कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झाली. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली आणि वीरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यानिमित्ताने पोलीस स्मृतिदिन संचलन समारंभदेखील पार पडला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडत शहीदांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शंभूराज देसाई उपस्थित होते.

कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी नायगाव पोलीस मुख्यालयातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहत अभिवादन केले.

आपली प्रतिक्रिया द्या