
महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार सोमवारी पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेती महत्त्वाचे मुद्दे –
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
- आंध्र प्रदेश सरकराने केलेल्या कायद्याचा अभ्यास करून त्यात सुधारणा करून नवा कायदा लवकरच आणणार
- महिलांच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर कायदा करण्यात येणार आहे
- प्रत्येकांना काम करण्याची इच्छा असते. मात्र, तीन पक्ष एकत्र असल्याने सामोपचाराने निर्णय घेण्यात आला आहे
- मंत्रीपद वाटपामुळे काही जणांची नाराजी असू शकते.
- शपथविधी नियमाप्रमाणे व्हावा, यासाठी राज्यपालांनी काही सूचना केल्या
- राज्यपालांसोबत आमचा कोणताही संघर्ष नाही
जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेली आपली ‘बेस्ट टीम’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- मंत्रीपदे आणि खातेवाटप तिन्ही पक्षाच्या सामंजस्याने झाले आहे.
- आधीच्या सरकारने कर्जमाफीसाठी ठेवलेल्या अटी आम्ही काढल्या आहे.
- या दोन निर्णयांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे
- अवकाळी पावसाच्या योजनेचे वाटप सुरू झाले आहे
- शेतकरी कर्जमाफीला प्राधान्य दिले आहे.
- खातेवाटप पक्षांप्रमाणे झाले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मी कडवट शिवसैनिक, नाराज असण्याचा प्रश्नच नाही! आमदार सुनील राऊत यांचा खुलासा





























































