व्हर्जिन उद्योग समूहाच्या प्रमुखांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

962

ग्रेट ब्रिटनमधील ‘व्हर्जिन उद्योग समूहाचे’ प्रमुख सर रिचर्ड ब्रॅनसन (Richard Branson) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत मुंबई-पुणे दरम्यान हायपर-लूप या प्रवाशी वाहतुकीसाठी वेगवान तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडित चर्चा करण्यात आली.

सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. हिंदुस्थानात विशेषत: महाराष्ट्रात त्यांच्या उद्योग समूहाला उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले. यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणूक आणि रोजगार संधीची माहिती दिली.

आपली प्रतिक्रिया द्या