
संभाजीनगर एमजीएम कॉलेज कॅम्पसमधील मनपाच्या प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक ही झाड तोडणार नाही तर फळफुलांची झाडे मोठ्याप्रमाणात लावण्यात येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित जागेची शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे,महापौर नंदकुमार घोडेले, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्ड्ये जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त उदय चौधरी आदींची उपस्थिती होती

























































