
शिवजयंती निमित्ताने विधान भवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राजशिष्टाचार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री शंभुराज देसाई, आमदार भास्कर जाधव आदी उपस्थित होते.
























































