मुख्यमंत्रीपद हे शिवरायांचे आणि जिजाऊंचेच आशीर्वाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2150
एकविरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवनेरी गडावर जाऊन नतमस्तक झाले आहेत.

अयोध्येच्या निकालानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी अनपेक्षितपणे माझ्यावर आली. याचा अर्थ असा की शिवरायांचा आणि जिजाऊंचाच हा आशीर्वाद आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

‘मी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाण्याआधी इथे आलो होतो आणि इथली माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. कुणी माना अथवा मानू नका, पण नोव्हेंबर ते नोव्हेंबर असा तो काळ. तोही निकाल चांगला लागला’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा जोरदार घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

‘या आशीर्वादानंतर मी हे माझे कर्तव्य मानतो. या पवित्र मातीला वंदन करण्यासाठी मी इथे आलो. जसा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, हे गोरगरीबांच, रयतेचं राज्य केलं, तसंच कार्य मला करायचे आहे. आणि मी अत्यंत नम्रपणाने जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झालो आणि हेच आशीर्वाद मागितले की, जसं तुम्हाला अपेक्षित आहे, माझ्या जनतेला अपेक्षित आहे, असं राज्य असा कारभार मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझे सोबती मिळून करू’, अशा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपले हे प्रेम आशीर्वाद कायम असेच असू द्या, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

  • उद्धव ठाकरे शिवनेरीवर नतमस्तक झाले
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर पोहोचले
  • एकविरा मातेचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवनेरी गडाकडे निघाले
  • उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे यांनी एकविरा देवीची मनोभावे पूजा केली
  • उद्धव ठाकरे एकविरेच्या दर्शनासाठी पोहोचले
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह आई एकविरेच्या दर्शनाला निघाले
  • एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवनेरीवर जाणार
  • राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी सकाळी लोणावळा येथील कार्ल्याच्या एकविरा देवीचे दर्शन घेणार
आपली प्रतिक्रिया द्या