मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळावर केले पंतप्रधानांचे स्वागत

4351

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुक्रवारी लोहगाव विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 7 आणि 8 डिसेंबरला होणाऱ्या देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आहेत.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार संजय काकडे, आमदार सर्वश्री भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे तसेच मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, एअर कमोडोर राहूल भसीन, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, लेफ्टनंट जनरल दीपेंद्रसिंग आहुजा, जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर, गणेश बिडकर आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या