कोस्टल रोडची यंत्रसामग्री सुरक्षितस्थळी, कामगारांना सुट्टी

356

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, कोस्टल रोडचे काम थांबवून कोस्टल रोडची यंत्रसामग्री सुरक्षितस्थळी हलवण्यात आली आहे. यात मोठया क्रेन, पायिंलग रिंग मशीन आणि इतर महत्त्वाच्या यांत्रिक गोष्टींचा समावेश आहे. दरम्यान, कोस्टल रोडच्या कामगारांची काळजी घेण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून कामगारांना आज सुट्टी देण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारा प्रिन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या ९.९८ किमीचा कोस्टल रोड मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी वरदान ठरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेचे सर्व नियम पाळून कोस्टल रोडचे काम सुरू आहे. मात्र, निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर, कोस्टल रोडची यंत्रसामग्री सुरक्षित ठिकाणी हलवण्याची काम मंगळवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले होते. यात क्रेन, मोठया पायिंलग मशीन्स खाली घेतल्या आहेत

आणि त्यांना कव्हरींग करण्यात आले आहे. इतर महत्त्वाच्या यंत्रसामग्रीनांही सुरक्षित करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोडचे काम सुरू असल्याची माहिती कोस्टल रोडचे मुख्य अभियंता विजय निघोट यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या