Cockroach Janta Party Protest – अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिपके यांनी 11 वाजता जंतरमंतरवरून संसद भवनाच्या दिशेने घडक मोर्चाला सुरुवात केली. मात्र त्यांना केरळ भवनजवळच पोलिसांनी अडवले. त्यानंतरही बराच वेळ पोलिसांनी त्यांना केरळ भवनकडून पुढे जाऊ दिले नाही. दरम्यान इतर आंदोलक हे संसद भवनाजवळ पोहोचले होते. मात्र पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सगळ्या दरम्यान अभिजीत दिपके यांना दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतले अशी माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ता सौरव दास यांनी दिली.