
यंदाचे रक्षाबंधन खऱया अर्थाने इकोफ्रेंडली ठरणार आहे. पर्यावरणाला पूरक ठरेल अशा साहित्यापासून अनेकांनी राख्या बनवल्या आहेत. यामध्ये मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थांचाही समावेश आहे. या टीमने ‘‘विकल्प’ उपक्रमांतर्गत करंवटीपासून अनोख्या राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांना मागणी वाढली असून त्या देशविदेशात पोचल्या आहेत.

हसन खान मूळचे सावंतवाडीचे. ते मालवणच्या स. का. पाटील महाविद्यालयात शिकवतात. विद्यार्थ्यांमधील काwशल्यांचा, कलागुणांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देणे, यासाठी त्यांनी ‘हुनर की पाठशाला’ हा उपक्रम 2018 सालापासून सुरू केला. याअंतर्गत पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मिती केली जाते. करंवटय़ांपासून राख्याही तयार करण्यात येतात. या वर्षी त्यांनी सुमारे 1500 राख्या तयार केल्या आहेत. हसन खान, त्यांची पत्नी अमरिन खान तसेच नवनीत मेस्त्र्ााr, पायल शिरपुटे, मधुरा ओरस्कर, अजय आळवे अशी त्यांची टीम आहे. प्रत्येक जण करवंटी कटिंग, ग्राईंडिंग, आर्टवर्क, पॅपिंग अशी कामे स्कीलनुसार करतात. 25 रुपयांपासून या राख्या विक्रीला उपलब्ध आहेत.
कोकणात नारळ मोठय़ा प्रमाणात वापरले जातात, मात्र त्यांच्या करवंटय़ाचा योग्य वापर केला जात नव्हता. चुलीमधील इंधन म्हणूनच जास्त वापर होतो. म्हणून आम्ही लोकांच्या चुलीमधून करवंटय़ा बाहेर काढल्या. करवंटय़ांपासून अनेक वस्तू तयार केल्या. यातून कार्बन फूटप्रिंट तर कमी होण्यास मदत होईल. तसेच प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूदेखील लोकांपर्यंत पोचतील.
n हसन खान, संस्थापक, हुनर की पाठशाला
वैशिष्टय़ काय
n नारळाच्या करवंटीपासून राख्यांची निर्मिती.
n राख्यांमध्ये बिया टाकलेल्या आहेत. म्हणजे त्या पुंडीत पिंवा मातीत घातल्यावर रोप वाढेल. (बिया फुलपाखरांच्या नेक्टर प्लॅन्टच्या आहेत.)
n नारळ्याच्या झावळ्यांपासून राखीसाठी इको पॅपिंग बॉक्स.
n राख्या महाराष्ट्रभरात पोचल्या आहेत. गोवा, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच लंडन, ओमानमध्ये पोचल्या.
































































