कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रोचे 50 टक्के भुयारीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, मुंबई

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी भुयारीकरणाचे काम गेल्या 19 महिन्यांमध्ये 50 टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी 17 टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) भूगर्भात उतरण्यात आल्या आहेत. या मेट्रो-3 प्रकल्पासाठी स्लॅब आणि कॉलम्स उभारण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

मेट्रो-3 साठी 56 टक्के भुयारीकरण करायचे आहे. कोणताही अपघात न होता आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाल्याबद्दल मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी आनंद व्यक्त केला. सप्टेंबर 2017 मध्ये या प्रकल्पाच्या भुयारीकरणासाठी पहिली टीबीएम मशीन कृष्णा-1 ही माहीमच्या नयानगर येथे भूगर्भात उतरवण्यात आली होती. 6 नोव्हेंबर 2017 पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सरुवात झाली होती. भुयारीकरणाचे 13 टप्पे यशस्वीरित्या पार पडले आहेत.

…येथून भूगर्भात उतरवल्या टीबीएम मशिन्स

नया नगर, कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धीविनायक, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कलिना विद्यानगरी, पाली मैदान, सारीपुत नगर, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय
विमानतळ टी-2

28 किलोमीटर भुयारीकरणासाठी 19504 सिमेंट रिंग्जचा वापर

टीबीएम मशिन्स भुयार खोदत पुढे जात असतानाच भुयाराला सिमेंटची वर्तुळाकार सेगमेंट रिंग्ज बसवली जात आहे. आतापर्यंत 28 किलोमीटर भुयारीकरणात अशा 19504 रिंग्ज वापरल्या गेल्या आहेत. या रिंग्ज बनवण्यासाठी सिमेंटबरोबरच 11983 मेट्रीक टन स्टीलचा वापर करण्यात आला. दर दिवशी 47.5 किलोमीटर भुयारीकरण केले जात आहे. त्यासाठी 1700 कामगार कार्यरत आहेत.