
कुलाबा परिसराला मुबलक पाणी मिळण्यासाठी पालिका या ठिकाणी 11 दशलक्ष लिटर क्षमतेची भूमिगत टाकी बांधणार आहे. यामुळे कुलाबा, कोळीवाडा, आझाद नगर परिसरात वारंवार निर्माण होणारी पाण्याची टंचाई कमी होणार आहे. या भूमिगत टाकीसाठी पालिका 23 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. पालिकेच्या ‘ए’ वॉर्डमधील कुलाबा परिसरातील रहिवाशांकडून कमी दाबाने पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा अशा तक्रारी वारंवार येत असतात. या पार्श्वभूमीवर या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘ए’ वॉर्डातील कुलाबा येथील मीनू देसाई मार्ग येथे पाण्याची साठवणूक करणारी भूमिगत पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे.





























































