कर्नल प्रसाद पुरोहित पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार देणाऱया मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या अर्जावर येत्या 12 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

कर्नल पुरोहित यांच्यासह मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एकूण सात संशयितांवर हे आरोप निश्चित झालेले असल्याने आता उच्च न्यायालयाने स्थगितीला नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालय याबाबत काय भूमिका घेते हे पाहावे लागणार आहे.