
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी स्टार वेणु माधव यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 39 वर्षाचे होते. गेल्या काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. हैदराबादच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. येथेच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेमामध्ये शोकाकूल वातावरण आहे.
मंगळवारी तब्येत बिघडल्याने वेणु यांना रुग्णालयादमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांनी उपचाराला प्रतिसाद देणे बंद केले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. वेणु यांच्या अकाली निधनामुळे दाक्षिणात्य सिनेमामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्वीटकरून वेणु यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

कॉमेडियन वेणु माधव यांच्या निधनाची माहिती मीडिटा कन्सल्टेंट वामसी काका यांनी ट्वीट केले करून दिली. अभिनेते वेणु माधव आता आपल्यात नाही. वेणु यांनी बुधवारी दुपारी 12.20 मिनिटांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि डॉक्टरांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देओ, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
Actor Venu Madhav Passed away today at 12.20 pm. Both the family members and doctors confirmed it. May his Soul Rest in Peace. #RIPVenuMadhav pic.twitter.com/iPvG5ICLsx
— Vamsi Kaka (@vamsikaka) September 25, 2019
मिमिक्रीने केली कारकीर्दीची सुरुवात
वेणु माधव यांनी एक मिमिक्री कलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कॉमेडी कलाकाराच्या भूमिका मिळू लागल्या. 1996 साली आलेल्या संप्रदायम (Sampradayam) या चित्रपटाद्वारे त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. अल्पावधीत त्यांनी आपला चाहतावर्ग तयार केला. 23 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी 200 तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले. 2016 मध्ये त्यांनी आपला अखेरचा सिनेमा Dr.Paramanandaiah Students चे शूटिंग केले. अद्याप हा सिनेमा प्रदर्शित झालेला नाही.






























































