
नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. आजपासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 1 जुलै 2026 पासून व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 183.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे 14.2 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Prices of the 19 KG Commercial cylinder have been slashed by Rs 183.50 from today. A 19 Kg cylinder will cost Rs 2930 in Delhi from today. Prices of 5 kg FTL have also been reduced by Rs 13 from today. 5 kg FTL will cost Rs 808.50 in Delhi: Sources pic.twitter.com/pzNGml1z7q
— ANI (@ANI) July 1, 2026
गॅस सिलिंडरचे नवीन दर
मुंबईमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 941.50 रुपये, तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 2885.50 रुपयांना मिळत आहे.
दिल्लीमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 942 रुपये, तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 2930.00 रुपयांना मिळत आहे.
कोलकातामध्ये घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 968 रुपये, तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 3072.00 रुपयांना मिळत आहे.
चेन्नईमध्ये घरगुती वापराचा गॅस सिलिंडर 957 रुपये, तर व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर 310.00 रुपयांना मिळत आहे.




























































