Manohar Parrikar रांगेत उभे राहणारे सामान्य माणसांचे मुख्यमंत्री पर्रिकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या देशाने संपूर्ण देश शोकाकूल आहे. साध्या राहणीसाठी पर्रिकर ओळखले जायचे. फक्त साधे कपडेच नव्हे तर त्यांचे राहणीमानही साधे होते.

हाफ शर्ट आणि साधी पँट हा पर्रिकरांचा नेहमीचा पेहराव असायचा. आपल्या मुलाच्या लग्नातसुध्दा त्यांनी असेच कपडे घातले होते. मुख्यमंत्रीपदी असताना त्यांना विमानाने प्रवास करावा लागत असे. तेव्हा बिझनेस क्लासने प्रवास करण्याऐवजी ते इकॉनॉमी क्लासने प्रवास करत असत. आपला बोर्डिंग पास घेण्यासाठीही ते रांगेतच उभे राहत.

संरक्षणमंत्रिपदी असताना त्यांनी एका लग्नाला हजेरी लावली होती. तेव्हा वधु वरांना शुभेच्छा देण्यासाठी ते रांगेत उभे होते. कधी कधी त्यांचे मुंबईत येणे होत असे तेव्हा ते लोकलने प्रवास करत. गोव्यातील निवडणूकीसाठी मतदानाचा हक्क बजावतानाही ते रांगेत उभे राहत आणि मतदान करत.

parrikar-in-voting-que

मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा जनता दरबार भरवला होता. तेव्हा एका महिलेने आपल्या मुलासाठी लॅपटॉप मागितला. तेव्हा महिलांच्या योजनेत लॅपटॉप देण्याची तरतूद नसल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले. तेव्हा पर्रिकरांनी आपल्या खिशातून या महिलेला लॅपटॉपसाठी पैसे दिले होते.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवणार्‍या पर्रिकरांच्या जाण्याने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे.