विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, गोरखपूर एक्सप्रेसमधील प्रकार

express

गोरखपूर-दादर एक्सप्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाश्याने तिकीट तपासनीसाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. ही ट्रेन नाशिक रोड स्थानकाजवळ असताना ही घटना घडली. सचिन कुमार यादव असं या तिकीट तपासनीसाचं नाव आहे.

अक्रम अर्शद सैयद (23, राहणार विठोबा नगर, कल्याण) असं या प्रवाश्याचं नाव आहे. गोरखपूर-दादर विशेष रेल्वेत विनातिकीट चढलेल्या अक्रम सोबत सचिन यांचा वाद झाला होता. त्या वादातून अक्रमने सचिन यांना मारहाण केली. या मारहाणीविषयी माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी त्वरित धाव घेत नासिक स्थानकात त्यांना उतरवलं. या घटनेत यादव हे जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.