
शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल.. पण हे खरं आहे.. एक कंपनी खरोखर अशी ऑफर देतेय. खरंतर ऑफिसमध्ये झोपा काढणं हे काही योग्य मानलं जात नाही. पण, कामाच्या ठिकाणी झोपा काढून हा पगार मिळवता येऊ शकतो.
ब्रिटनमधील एक कंपनी ही ऑफर देत आहे. क्राफ्टेड बेड्स असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीत नोकरी करणाऱ्या व्यक्तिला एक खास टास्क देण्यात येणार आहे. या व्यक्तीला दररोज सहा ते सात तास झोपावं लागेल.
ही कंपनी जे बेड्स बनवते, त्या बेड्सवर त्या व्यक्तिला रोज झोपावं लागेल. तसंच, दर आठवड्याला या गादीचं परीक्षण करावं लागेल. तसंच, त्यात सुधारणेच्या शक्यता, त्रास, फायदे यांचं परीक्षण करून त्याचा अहवाल द्यावा लागेल.
हे काम करणाऱ्या माणसाला दरवर्षी 24 लाख 79 हजार रुपये मिळणार आहेत. ही नोकरी करणाऱ्या व्यक्तिला 37.5 तास दर आठवडा म्हणजे दररोज सहा तास झोपावं लागेल.




























































