
येत्या 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱया गणेशोत्सवाकरिता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक – 2 लाख 50 हजार, तृतीय क्रमांकाला 1 लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळास 25 हजार रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पु. ल. देशपांडे कला अकादमी यांच्या www.pldeshpandekalaacademy.org या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज [email protected] या ई-मेलवर 30 ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील.


























































