
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोशनगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले असून या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी म्हणून पंचनामे आवश्यक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करून शासनास सादर करावे. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, अंबडगाव, रोषणगाव, नानेगाव येथे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. यावेळी सोबत माजीमंत्री अर्जुनराव खोतकर,आमदार नारायण कुचे, माजी आमदार संतोष सांबरे, भानुदास घुगे, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण, भाऊसाहेब घुगे, भगवान कदम व उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
सत्कार नाकारला
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे बदनापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आले असता अंबडगाव येथील सरपंच राजेंद्र जऱ्हाड यांनी राज्यमंत्री शेख सत्तार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्याचा प्रयत्न केला असता सत्तार यांनी सत्कार व स्वागत नाकारसी. मी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आलेलो आहे, स्वागत किंवा सत्कार घेण्यासाठी नाही, मला शेतकरी महत्वाचे आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली म्हणजेच
माझा सत्कार झाला असे समजा असे सांगून सत्कार नाकारला.


























































