काँग्रेसचा समाजवादी पक्षाला धक्का, लखनौमधून जाहीर केला उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात दोन उत्तर प्रदेशचे आणि एक लखनौच्या उमेदवाराचा समावेश आहे. लखनौमधून सपाने शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना उमेदवारी दिली होती. आणि काँग्रेसने उमेदवार देऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. परंतु काँग्रेसने लखनौमधून आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी देऊन धक्का दिला आहे.

लखनौमधून केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांना हरवण्यासाठी सपा बसपाने चांगलाच चंग बांधला आहे. त्यासाठी सपाने भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांना पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच लखनौमधून त्यांना उमेदवारीही जाहीर केली होती. त्यानंतर काँग्रेसने भाजपला हरवण्यासाठी उमेदवार  देऊ नये यासाठी काँग्रेसला गळसुद्धा घातली होती. परंतु काँग्रेसने सपाची ही विनंती फेटाळत आचार्य प्रमोद कृष्णम यांना उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसने विनय कुमार पांडे यांना कैसरगंजमधून तर पंकज सिंह यांना मध्य प्रदेशमधील इंदूरमधून उमेदवारी दिली आहे. इंदूर हा भाजपचा बालेकिल्ला समजलातो जातो. तिथून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन या 9 वेळा निवडून आल्या होत्या. पक्षाने उमेदवारी जाहीर करण्यास वेळ लावला म्हणून त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. भाजपने अजूनही तिथून उमेदवार जाहीर केलेला नाही.