
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. तेव्हा अनेक नेत्यांनी राजकीय गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. नुकतंच काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली आहे. तसेच यावेळी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा उपस्थित होते.
Mumbai: Congress MLA Jaykumar Gore & BJP MP Ranjitsinh Naik Nimbalkar met state Water Resources Minister Girish Mahajan y’day. Jay Kumar Gore’s office says that speculations that his meeting was in connection with him joining BJP are false, the meeting was not for that purpose. pic.twitter.com/Kwox99ORo5
— ANI (@ANI) June 1, 2019
जयकुमा गोरे यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. जयकुमार भाजप प्रवेश करणार का असा या भेटीमागे अर्थ लावला जात आहे. परंतु हे वृत्त गोरे यांनी फेटाळले असून यात काहीच तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच भाजप प्रवेशासाठी ही भेट नव्हती असेही गोरे म्हणाले.




























































