लोकसभा नाही विधानसभाच लढवणार, पृथ्वीराज चव्हाणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
prithviraj-chavan

#MahaElection 2019 राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा पोटनिवडणूक लढणार की विधानसभा निवडणूक लढवणार यावरील चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. पृथ्वीराज चव्हाण हे आता आमदारकीची निवडणूक लढवणार आहेत. त्यांना काँग्रेसकडून दक्षिण कराड येथून उमेदवारी देण्यात येणार आहे. वृत्तवाहिन्यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणूक किंवा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढायचे, याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार असल्याचे सूतोवाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण चव्हाण यांनी केले होते. काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्यासह वरिष्ठांशी चर्चा झाली असून कार्यकर्त्यांच्याही भावना समजून घेतल्या आहेत. आता सद्सद् विवेक बुद्धीला पटेल तो निर्णय येत्या दोन दिवसांत घेणार आहे. असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या ब्लॉक कमिटीच्या मेळाव्यामध्ये कराड येथे केला होता.