
मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजप नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे देशात हिंसाचार वाढला आहे यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. हिंदुस्थान हा शांत आणि संयमी देश असून जगात सत्य व अहिंसक म्हणून हिंदुस्थानचा दाखला दिला जातो. हिंसा आणि द्वेष हिंदुस्थानला कदापि मान्य नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे देशभरात हिंसाचार सुरूच आहे. पोलिसांवर काही ठिकाणी दगडफेक होत आहे, तर आंदोलकांना रोखण्यासाठी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर पोलिसांना करावा लागत आहे. याबाबत चिंता व्यक्त करत राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. ‘हिंदुस्थानी म्हणून आपण एकोप्याने राहणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
























































