मुंबई काँग्रेसच्यावतीने उद्यापासून पदयात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चले जाव आंदोलनाला या वर्षी 80 वर्षे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर 9 ऑगस्ट क्रांती दिवस ते 14 ऑगस्ट दरम्यान मुंबईत “आजादी की गौरव यात्रा” या अभियानाअंतर्गत पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचा शुभारंभ 9 ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त होणार आहे. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख, माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.