मनेका गांधी, वरुण यांच्या मतदारसंघांची अदलाबदली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपने उत्तर प्रदेशातील 29 आणि पश्चिम बंगालमधील 10 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण यांच्या मतदारसंघांची अदलाबदली करण्यात आली आहे. विद्यमान सात खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांना उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्या कानपूर मतदासंघात आता सत्यदेव पचौरी हे उमेदवार असतील. मनेका गांधी यांना यावेळी सुलतानपूरमधून तर वरुण गांधींना पिलीभितमधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या मतदारसंघाची अदलाबदली केली आहे. प्रतिष्ठेच्या अलाहाबाद लोकसभा मतदारसंघात उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री रिटा बहुगुणा-जोशी, गाझीपूर येथून केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, फत्तेपूरमधून साधवी निरंजन ज्योती यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील 10 उमेदवार जाहीर केले. त्यात तृणमूल काँग्रेसमधून आलेले हुमायून कबीर यांना मुर्शिदाबाद येथून भाजपने उमेदवारी दिली आहे.