
जम्मू-कश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि जम्मू-कश्मीर प्रशासनाला न्यायालयाने नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर मागवले आहे.

























































