बरेलीत रस्त्यावर नमाज पठणावरून वाद, इमामसह 100 जणांवर गुन्हे दाखल

सामना ऑनलाईन । बरेली

बरेलीमधील एका दर्ग्याशेजारील रस्त्यावर नमाज पठणावरून वाद उफाळला होता. या वादात पोलिसांनी इमाम आणि 100 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बरेलीमधील राष्ट्रीय महामार्गावर एक दर्गा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मुस्लिम लोक नमाज पठण करतात नमाज पठणामुळे मोठा ट्रॅफिक जॅम होतो. पोलिसांनी याची दखल घेत, नमाज पठण करण्यास बंदी घातली होती. हा विरोध डावलून काही मुस्लिमांनी भर रस्त्यात नमाज पठण करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम लोकांनी पोलीस स्थानकात धाव घेत पोलिसांना घेराव घातला. नंतर ही गोष्ट जस जशी पसरत गेली पोलीस स्थानकात गर्दी वाढत गेली. जमावाने इन्स्पेक्टर पंकज वर्मा यांना धमकी दिली. पोलिसांनी खबरदारी म्हणून अधिक कुमक मागवली. नंतर पोलिसांनी पुन्हा उपस्थित जमावला सुनावले. उपस्थित जमवाने पुन्हा दर्ग्याजवळ जात नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत  मशिदीचे इमाम त्यांचा मुलगा आणि 100 जणांव र गुन्हा दाखल केला.