
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांना झटका बसला आहे. एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठल्यानंतर आता एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीही ((LPG Gas cylinder price)) वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये 25 रुपये 50 पैसे वाढ केली आहे, तर व्यवसायिक वापरासाठीच्या (commercial gas cylinders) गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये तब्बल 84 रुपयांची वाढ केली आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या किंमतींची जाहीर करत असतात. आज 1 जुलैला कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ केल्यानंतर आता राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 834 रुपये झाली आहे.
140 रुपयांची वाढ
गेल्या सहा महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत 140.50 रुपयांची वाढ झाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत 694 रुपये होती, आता हिच किंमत 834.50 रुपये झाली आहे.
प्रमुख शहरांतील घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरच्या किंमती
दिल्ली – 834.50 रुपये
मुंबई – 834.50 रुपये
कोलकाता – 861 रुपये
चेन्नई – 850 रुपये
दरम्यान, व्यवसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 84 रुपये वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीत याची किंमत 1,550, मुंबईत 1,507, कोलकातात 1,651.50 आमि चेन्नईत 1687.50 रुपये झाली आहे.
जूनमध्ये वाढ नाही
जून महिन्यामध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र व्यवसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती 123 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या.



























































