कॉर्डेलियावरील आणखी 139 जण कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यातून मुंबईत आलेल्या कॉर्डेलिया क्रूझवरील 1 हजार 827 प्रवाशांची चाचणी केली असता आणखी 139 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी या क्रूझवरील 60 जण पॉझिटिव्ह आले होते. प्रयोगशाळांतील रिपोर्ट बुधवारी मुंबई महापालिकेला मिळाले. कॉर्डेलिया क्रूझ मंगळवारी सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर त्यावरील 60 कोरोनाबाधित रुग्णांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोरोना केंद्र, सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालय आणि इतर विविध हॉटेल्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर जहाजावरील एकूण 1 हजार 827 प्रवाशांची कोरोना तपासणी करून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले.